बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे >. मंत्रिमंडाळाचा विस्तार होताच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती शिंदे गटातील सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी सापळे रचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा आहे. या श्रीमंत महानगरपालिकेतील ठाकरेंची सत्ता उलथवून महापालिका ताब्यात घेण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे सरसावले आहेत. भाजप आणि शिंदे हे राज्यात सोबत आहेत, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेत देखील सत्तेत येऊ इच्छित आहेत. तसेच ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. त्यावरच आधारित राजकारण ठाकरे करतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आता भाजपा तसेच शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे.
मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदारांवर शिवसेनेच्या चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. तशी व्युहरचना केली जात आहे. शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांमध्ये मुंबईतील पाच आमदार आहेत. त्यात मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांवर आणि मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाची मोठी मदार आहे. शिंदे गटात दाखल झालेले खासदार राहुल शेवाळे यांच्यावरही मुंबई महानगरपालिकेची विशेष जबादारी सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे 40 ते 45 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता
