गेले कित्येक दिवस जगभरातील आरोग्यविषयक तज्ज्ञ कोरोना महामारीच्या नव्या लाटेचा इशारा देत होते. त्यातच कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने आता युरोप आणि अमेरिकेमध्ये वेगाने पसरणे सुरू केले असून अनेक ठिकाणची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढविण्यात ओमायक्रॉन हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ब्रिटन, फ्रान्स, इटली आदी देशांमध्ये कोरोनाच्या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. या वाढीव रुग्णांमध्ये मृतांची संख्या कमी आढळत असल्याने ती एक थोडा दिलासा देणारी बाब म्हटली पाहिजे. तसेच खरी चिंतेची बाब म्हणजे रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या बहुतांश रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. तरीही त्यांना ‘ओमायक्रॉन’ने गाठले आहे. अमेरिकेमध्ये सात दिवसांत रुग्णांची सरासरी संख्या दोन लाखांच्या फारच पुढे गेली आहे. ‘ओमायक्रॉन’ला आधीच अमेरिकेतील सर्वात प्रभावी व धोकादायक व्हेरिएंट म्हणून घोषित केले आहे. वॉशिंग्टनमध्ये दररोज सरासरी 1,300 हून अधिक, तर न्यूयॉर्कमध्ये एकाच दिवसांत 49,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील केवळ 62 टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे आणि मोठ्या लोकसंख्येचे अद्याप लसीकरण न झाल्यामुळे किंवा केवळ अंशतः लसीकरण झाल्यामुळे आरोग्यतज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. ब्रिटनमध्ये नव्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ख्रिसमसच्या दिवशीही दहा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. पण त्यापूर्वी सलग चार दिवस ब्रिटनमध्ये दिवसाला दहा लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली होती. फ्रान्समध्येही दैनंदिन प्रकरणांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली. हा एक नवा विक्रम आहे. मात्र, ब्रिटनने नवीन वर्षासाठी कोणतेही नवीन निर्बंध लादणार नसल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्येही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. परदेशांमध्ये अशी चिंताजनक अवस्था असताना आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगणे गरजेचे होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याची विनंती सर्व राज्य सरकारांना वेळोवेळी करत आहेत. त्यांना लागणारी सर्व मदत व मार्गदर्शन केंद्र सरकारतर्फे केले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘यलो अॅलर्ट’ घोषित केला. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, व्यायामशाळा लवकरच बंद होणार आहेत. मेट्रो ट्रेन आणि बस 50 टक्के क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 10 ते पहाटे 5 या कालावधीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यांना पूर्णपणे बंदी घातली आहे. एकीकडे देशापुढे ओमायक्रॉनचे संकट उभे ठाकल्याने केंद्र सरकारने राज्यांना योग्य ती पूर्व काळजी घेण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे मात्र पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुका हा चिंतेचा विषय ठरत आहेत. ओमायक्रॉनमुळे राज्यांकडून निर्बंध आणले जात असताना दुसरीकडे राजकीय पक्षांना मात्र कोरोनाचा जणू पूर्ण विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. हे पक्ष सभांसाठी लोकांची गर्दी जमवताना दिसत आहेत. त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टानेही ओमायक्रॉनची दखल घेत निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राज्यात निवडणुकीसंबंधी प्रचारसभांवर बंदी घालण्याची आणि ओमायक्रानचे रुग्ण वाढत असल्याने निवडणूक काही काळासाठी पुढे ढकलण्यासंबंधी विचार करण्याची विनंती केली आहे. जर सभांवर बंदी आणली नाही, तर दुसर्या लाटेपेक्षाही वाईट परिणाम दिसू शकतात, असा इशारा न्यायमूर्ती शेखर यादव यांनी दिला असून आयुष्य असेल तरच जग आहे, असेही म्हटले आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने केंद्राला निवडणुका असणार्या राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आदेश दिला आहे. या राज्यांमध्ये सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय गाठावे, असे म्हटले आहे. 2022च्या पहिल्या तिमाहीत गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या पाचही राज्यांमधील निवडणुकांवर ओमायक्रॉनमुळे संकट निर्माण झाले असून त्याबाबत अनिश्चितता आहे. इतके सर्व सुरू असताना महाराष्ट्र आणि राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील ही 216 दिवसांनंतरची सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. मुंबईत गेल्या सात दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढेही कोरोना निर्बंधांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास संख्यात्मक वाढीच्या रूपाने त्यांची किंमत मोजावी लागण्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यात 20 डिसेंबरला सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 5000 ते 6000 इतके होते. मंगळवारी संध्याकाळपर्यंत हा आकडा 11492 इतका झाला होता, तर बुधवार संध्याकाळपर्यंत हा आकडा 20 हजारांच्या पलीकडे जाऊ शकतो. मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 2100 वर पोहोचण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती एकाच दिवसात रुग्ण दुप्पट होण्यासारखी आहे. त्यामुळेच सर्व काही सुरळीत होत असतानाच हा धोका पुन्हा निर्माण झाला असून त्याला सरकारी यंत्रणांबरोबरच आपण सारे सुजाण नागरिकही तितकेच जबाबदार आहेत, हे निश्चत.
Similar Posts
इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लिमेसी
नवी दिल्ली/राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे हेही असणार आहेत. हे दोन्ही नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेटही घेणार आहेत. राहुल…
विरार मध्ये बविआ – भाजपात राडा
विनोद तावडेंवर पैसे वाट्ल्याचा आरोपविरार – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदाराना पैसे वाट्ल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे व भाजप उमेदवार राजन नाईक ज्या हॉटेलवर थांबले होते तिथे जाऊन तावडेंना जाब विचारला तसेच राजन नाईक याना धक्काबुकी केली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद तावडे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट
दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार असून त्यासाठी देश विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोडीन ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांनी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली त्यामुळे काँग्रेससह 15…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात
मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईकर रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरताच महा विकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय सरकार येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.लॉक…
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली…
आता सहकार क्षेत्रातील घोटाळे बाजांची खैर नाही-
मुंबई/महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल एक बैठक बोलावली होती या बैठकीच्या माध्यमातून अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती घ्यायला सर्वात केल्याने आता सहकार क्षेत्रातील लुटारूंनी खैर नाही असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई…
