भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासाला आणि न्याय हक्काला कुठेही तदा जाणार नाही याची संविधानात काळजी घेतली होती पण आज मात्र तोच सामान्य माणूस कट्टरपंथीय लोकांच्या नादी लागून देशाच्या सुरक्षेसामोर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहिलाय आणि हीच खरी चिंतेची बाब आहे.शनिवारी मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मोर्चा निघाला आणि नंतर सभा झाली त्यातील नेत्यांची भाषणे ऐकून या देशात जर हे असेच चालू राहिले तर शांततेने जगणाऱ्या माणसाने करायचं तरी काय? धर्माच्या नावाने जातीच्या नावाने अशा प्रकारचे मोर्चे निघणे आणि त्यातून सरकार किंवा विरोधकांना धमकीवजा इशारे देणे हे कशाचे द्योतक आहे? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.भारताचा खरा चेहरा अर्थातच सेक्युलर आहे. पण आज देशातील किती पक्ष सेक्युलॅरिझम मानतात ? भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सोडा पण काँग्रेस,समाजवादी,राष्ट्रवादी, सपा,बसपा,आणि इतर पक्ष तरी सेक्युलर म्हणवून घेण्याचा पात्रतेचे आहेत का? तसे असते तर त्यांनी निवडणुकीत केवळ त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर लोकांकडे मते मागितली असती पण तसे न करता आज प्रत्येक पक्षाला जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवण्याची पाळी यावी यातच सर्व काही आले.मात्र हे कुठे तरी थांबायला हवं ओवेसी असो की योगी धर्माचा अजेंडा पुढे रेटणारे हे लोक लोकशाहीसाठी घटक आहेत त्यामुळे अशा लोकांच्या मागे फरफटत जाणे म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे.ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायलाच हवी.मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण यासारख्या वादग्रस्त विषयांमध्ये स्वतःला गुरफटून घेणे म्हणजे जातीय तणावाला रान मोकळे करून देण्यासारखे आहे.आजचे युग हे विज्ञान युग आहे तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या निक्षावर तपासली जाते त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जाती धर्म आणि त्यातील रूढी परंपरांना कवडीची किंमत नाही .आणि म्हणूनच हिंदुत्ववादी असोत की मुस्लिम कट्टर पांठी असोत या लोकांच्या विरोधात उभे राहून हा देश,हे स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे.
Similar Posts
गुलाम वंशाचा गोऱ्यांवर विजय- ऋषी सूनक इंग्लंडचे पंत्रधान
लंडन/ नियती मोठी विचित्र आहे ती कधी कोणाला शिखरावर पोचवेल आणि कधी कोणाला खड्ड्यात घालील याचा नेम नाही ज्या ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले त्याच भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्लंडचे नावे पंत प्रधान बनले आहेत.आर्थिक प्रश्नांवरून इंग्लंड मधील राजकारणात मोठी उलथापालथ झालीय सुरुवातीला पंतप्रधान जॉन्सन यांनी राजीनामा दिला त्यानंतर लिझा ट्रीस या पंतप्रधान झाल्या…
धारावीत गॅस सिलेंडरचा स्फोट; १४ जखमी २ गंभीर
मुंबई/ काल दुपारी धारावीच्या शाहू नगर मधील मुबारक हॉटेल समोर असलेल्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत १४जन जखमी झाले असून त्यातील दोघेजण ७० टक्के भाजलेले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ…
निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर लाडकी बहीण योजनेला स्थगिती
मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तिच्या कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल आहे. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. याच आचारसंहितेच्या कारणावरून निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांसाठी एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. त्यानुसार मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या सर्व योजनांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत….
“प्रशासकीय नेतृत्व देणाऱ्या संस्थेची (युपी एससी) यशस्वी शताब्दी !”
देशावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन- युपीएससी) नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली. देशाला प्रशासकीय नेतृत्व देण्याचे मोलाचे काम ही संस्था यशस्वीपणे करत आहे. शताब्दी निमित्त आयोगाच्या कामगिरीचा घेतलेला धावता आढावा. केंद्र सरकार किंवा विविध राज्यांचे प्रशासन अत्यंत कणखरपणे चालवण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. भारतातील…
लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला
मुंबई : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही या योजनेसाठी सातत्याने महिला भगिंनींना आवाहन केलं आहे. ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासनस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सविचांना घेऊन समिती…
केंद्राकडून ४ नवे लेबर कोड लागू आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न सुरू
नवी दिल्ली/केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नव्या श्रम संहिता लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या चार श्रमसंहिता आजपासून देशभरातलागू होतील. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस २०१९, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड २०२०, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी २०२० आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड २०२० याचा समावेश आहे….
