अकोला -अ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेले मनसेच्या कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते.
राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकार यांचाही सहभाग होता. या राड्यानंतर जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण आता त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.या घटनेनंतर मनसेवर शोककळा पसरली आहे.

