[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महायुतीच्या नेत्यांना अमित् शहानी सुनावले


मुंबई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईच्या दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तसेच वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गणपती बाप्पाचे तसेच सागरवर जावून फडन्विसंच्या गणपतीचे दर्शन घेतले तत्पूर्वी अमित शहां यांनी महायुतीच्या नेत्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेत विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या फोर्मुल्याव्र चर्चा झाली . यावेळी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीट दिले जावे असे अमित् शाहा यांनी सांगितले. तसेच महायुती मधील पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात बोलू नये तसेच जागा वाटप किंवा इतर बाबींची प्रसारमध्यमामध्ये चर्चा करू नये असेही सांगितले आहे . अमित शहा महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मुंबईत आल्याचे सांगितले जाते

error: Content is protected !!