ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इंडिया आघाडीतून आम् आदमी पक्ष बाहेर


नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने शुक्रवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीशी काडीमोड घेतला. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार केला होता, मात्र आता आपच्या निर्णयाने इंडिया आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील आगामी निवडणुकांवर काय पडसाद उमटणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकारण हा पोरासोरांचा खेळ नाही’, असे सांगत काँग्रेस नेतृत्वावरही ‘आप’चे खासदार सिंह यांनी सडकून टीका केली व ‘ससंदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, आज, शनिवारी होणाऱ्या ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या बैठकीला पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नसइंडिया’ची स्थापना फक्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती. पक्षाने त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या आहेत. ‘आप’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही पंजाब, गुजरात, दिल्ली आणि हरियाणा विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवल्या व आगामी बिहार निवडणुकाही स्वबळावर लढू. आपला पक्ष संसदेत विरोधी पक्षांशी धोरणात्मक युती करेल’, असे सिंह यांनी स्पष्ट केले

error: Content is protected !!