मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत त्यातील 70 मुंबई शहरात 104 पूर्व उपनगरात आणि 163 पश्चिम उपनगरात आहेत आणि नेहमी प्रमाणे या सर्व इमारतींना पालिकेने नोटीस दिलेली आहे पण नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपली का? या धोकादायक इमारतींचा पुनरविकास वर्षणंवर्ष रखडलेला आहे.आज काल बिल्डर लोक ज्या पद्धतीने जागा हडप करीत आहेत ते पाहता लोकांच्या मनात भीती आहे जर आपण पुनर्विकास करण्यासाठी आपली इमारत एखाद्या बिल्डरच्या हवाली केली तर तो आपल्याला पुन्हा घर देईल की नाही याची लोकांच्या मनात खात्री नाही त्यामुळे लोक आपली राहतो जागा सोडायला तयार नाहीत बिल्डिंग पदुला असली तरी त्यातच राहतात त्यामुळे अशा मोडकळीस आलेल्या इमारती मधील रहिवाश्यांना पालिकेने किंवा सरकारने विश्वास द्यायला हवा.त्यांना लेखी स्वरूपात सरकारकडून आश्वासन मिळायला हवे.तरच लोक मोडकळीस आलेल्या इमारती खाली करतील दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यातील बहुतेक खाजगी मालकाच्या आहेत आणि हे मालक काही मोडकळीस आलेल्या इमारतीकडे लक्ष देत नाहीत उलट त्यांचा या इमारतीमधील जुन्या भाडेकरूंना हाकलून इमारतीची जागा कोट्यवधी रुपयांना बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि म्हणूनच लोक इमारती खाली करीत नाहीत परिणामी मुंबईतील मोडकळीस आलेल्या ईमारतीय प्रश्न पावसाळ्यात खूपच गंभीर बनत आहे म्हाडा किंवा एस आर ए या सरकारी गृहनिर्माण संस्थांवर लोकांचा विश्वास नाही कारण एस आर ए योजने अंतर्गत ज्या ज्या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत त्याला त्याला दहा दहा वर्ष झाली तरी ते पूर्ण झालेले नाहीत परिणामी लोक संक्रमण शिबिरातील खुराड्या मध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत .ज्यांनी संक्रमण शिबिरातील खोल्या घेतल्या नाहीत त्यांची बिल्डर भाडी थकवतोय अशी आज परिस्थिती आहे म्हणूनच धोकादायक इमारतींमधील लोक आपली घरे खाली करीत नाहीत परिणामी पावसाळ्यात मोठे अपघात होतात आणि लोकांचा जीव जातो त्यामुळे ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे .
Similar Posts
खंडेश्वर मध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ६ तरुणींची सुटका २ दलालांना अटक
मुंबई/ पनवेल नजीकच्या खंडेश्वर येथील खांदा कॉलनीतील एका इमारीवर पोलिसांनी धाड टाकून छुप्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला या प्रकरणी दोन दलालांना अटक करण्यात आली आहे तर ६ मुलींची सुटका करण्यात आलीखांदा कॉलनीतील एका इमारतीमधील घरात छुपा वेष्य व्यवसाय चालतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली आणि तिथल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…
एक देश – एक दर – तोही आता सोन्याचा ??
गेली अनेक दशके विविध राज्यांमध्ये सोन्याचा वेगवेगळा दर असतो. काही राज्यांमध्ये तो जास्त असतो तर काही राज्यांमध्ये स्वस्त पडतो. परंतु “एक दर- एक जीएसटी” किंवा ” एक देश – एक निवडणूक” या धर्तीवर सोन्याच्या बाबतीत आता “एक देश – एक दर” होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संकल्पना अस्तित्वात आली तर त्याचे चांगले लाभ किंवा…
मुश्रीपणा पालकमंत्रिपद मिळताच – अजित पवार यांच्याकडून कोल्हापुरवर योजनांचा पाऊस
मुंबई : पालकमंत्री बाजी मारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकल्यानंतर मोठा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेतला आहे. कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. त्यासाठी शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी…
दादर मध्ये मनसे विरूद्ध शिवसेना पुन्हा संघर्ष उफळणार
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराच्या प्रमुख भागात नाका तिथे शाखा ही संकल्पना राबवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला होता त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.त्यानुसार शिवसेना ठाकरे गटावर दबाव वाढवण्यासाठी मनसेने सेना भवनाच्या जवळ असलेल्या जिप्सी हॉटेल जवळ शाखा उघडण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी वाढ दिवशी स्वतः राज ठाकरे…
हिंदू मारला जातो तेव्हा तुमची तोंड बंद का असतात ? योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांना सवाल
लखनौ/बांगलादेशात एक दलित हिंदू मारला गेला त्याबाबत विरोधी पक्षातील लोक काहीच बोलायला तयार नाहीत. पण अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला की सगळेच छात्या पिटाटायला लागतात. हे दुष्टीकरणाचं राजकारण बंद करा असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांना सुनावलेलखनऊ मध्ये सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून…
जरांगे व मराठा समाजाने भाजप पासून सावध राहावे – उद्धव ठाकरे
मुंबई : आज मुंबईत दोन दसरा मेळावे झाले दोन्हीकडे फुल गर्दी होती यावेळी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बोलताना जरांगे पाटील व मराठा समाजाने भाजप पासून सावध राहावे असे सांगितलेशिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणापासून ते राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर स्पष्ट भाष्य केले. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे…
