ओरस/ शिवसेना आणि राणे यांच्यासाठी अत्यंत प्रतिषठेच्या लढाईचा एक मोठा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे.
२४०० कोटींची उलाढाल असलेली ही बँक गेल्या पाच वर्षात ९०० कोटींच्या नफ्यात आली शिवाय बँकेचा कारभारही स्वच्छ असून कोणताही घोटाळा झालेला नाही त्यामुळे राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही बँक ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून दुसरीकडे महाविकास ही निवडणूक लढवणार असल्याने राणे यांच्या समोर कडवे आव्हान आहे
Similar Posts
अखेर तब्बल एक वर्षा नंतर शेतकरी आंदोलन स्थगित शेतकऱ्यांनी सरकारला हरवले
दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी…
साईली प्रशांत भाटकर यांचा सन्मान
पनवेल महानगरपालिका स्वीप-2021 च्या उत्सव मतदार साक्षरता नोंदणी व जनजागृती अभियानाअंतर्गत, विषयाच्या अनुशंगाने मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र, जिंगल मेकिंग, अशा सामाजिक संदेश देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा 30 डिसेंबर 2021 रोजी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात संपन्न झाला. मराठी कलाकारांचे या जनजागृतीविषयीच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वदेशी…
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या व माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
मुंबई/ ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या ९४ वर्षाच्या होत्या, गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आता वृधापकाळाने त्यांच निधन झालं आहे.शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या…
देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला मराठी भाषेचा गौरव
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार मुंबई – भाषा हे फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी भाषेची नाळ जोडलेली असते. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेचा गौरव केला….
आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण
भाईंदर :-सत्ताधारी आघाडीतील आमदारांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संजय बांगर, अब्दुल सत्तर यांच्या पाठोपाठ आता महिला आमदारही मागे राहिलेल्या नाहीत मंगळवारी भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली . या घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केलं आहेआमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली…
राहुल गांधी प्रमाणेच लालूच्या मुलाचाही पराभव होईल – प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
पाटणा/बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान ६ नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान ११ नोव्हेंबरला होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष पहिल्यांदा रिंगणात आहे. तेजस्वी यादव यांच्या राघोपूर विधानसभा मतदारसंघात पोहोचले आहेत. प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांना इशारा दिला आहे….
