मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी जे 27 हजार प्रस्तावित करण्यात आले आहेत ते कुठून आणणार त्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जनतेच्या खिशात हात घालायला लागणार याचा पालिका आयुक्तांना आणि शिंदे सरकारला विसर पडलेला आला तरी लोकांना मात्र आज ना उद्या पालिका आपला खिसा कापणार याची कल्पना आहे. त्यामुळे जरी करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला तरी मुंबईकरांच्या मनातली भीती कायम आहे. मुंबईच्या विकास कामांसाठी 247 कोटी 80 लाखांची तरतूद आहे सागरी प्रकल्पासाठी 3545 कोटींची तरतूद आहे तोट्यात असलेल्या बेस्ट साठी 800 कोटी दिले जाणार आहेत म्हणे महसुली स्त्रोत वाढवणार? ते कसे काय हे मात्र सांगण्यात आलेले नाही हा एक मात्र आहे झोल मार्गाने पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा पैसा जर थांबवला तर आर्थिक तूट भरून निघेल पण त्यासाठी प्रत्येक प्रकल्पाची मॉनिटरी योग्य रित्या व्हायला हवी पण ती करणार कोण ? सवाल सरकारचा तर त्यांना फक्त पालिका निवडणुक जिंकायची आहे त्यासाठी पालिकेच्या तिजोरीला आग लावायची ? सगळ्या राजकीय पक्षणा ओळखून आहेत
Similar Posts
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल…
मला जास्त बोलायला लावू नका सर्व बाहेर काढीन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुंबई : लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. तर पोराटोरांवर मी बोलत नाही, असे म्हणत नाव न घेता आदित्य ठाकरेंवरही शिंदेनी निशाणा साधला. एबीपी…
पोलिसांच्या घरांचे स्वप्न अधुरे राहणार ?
मुंबई)मुंबई शहरामध्ये पोलीसांकरिता पोलीस हाऊसिंग प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने उचित शिफारशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या आणि सुरक्षिततेच्या जबाबदाऱ्या विचारात घेता, मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांकरिता सुमारे ४० हजार निवासस्थाने तयार करण्यात येणार आहे. पोलीस उप-निरिक्षक व पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ५००० निवासस्थाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काही निवासस्थाने…
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीने…
गणेशविसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम तलावात – कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले
.मुंबई – २०२० नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांवर निर्बंध लादले. पीओपीच्या गणेश मूर्ती बनवणे, विकणे व वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली. जेणेकरून जलप्रदूषण होऊ नये. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलवरही बंदी घालण्यात आली. त्याऐवजी चिकणमातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आदेश देण्यात आले. पॉप लवकर विरघळत नाही त्या ऐवजी चिकन माती…
भ्रष्टाचार प्रकरणी आघाडी सरकारचे २० मंत्री रडारवर
ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
