मुंबई/ १०० कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआय ने साक्षीदार म्हणून समन्स बजावले असून या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची साक्ष या प्रकरणात महत्वपूर्ण ठरणार आहे
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींची खंडणी गोळा करण्याचे आदेश सचिन वाझे यांना दिल्याचा आरोप आहे हे प्रकरण गल्ली पासून दिल्ली पर्यंत गाजले संसदेत सुधा या प्रकरणावर चर्चा झाली तर अनिल देशमुख यांचे याच प्रकरणात गृहमंत्री पद गेले आता या प्रकरणात थेट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांची साक्ष होणार असल्याने त्यांच्या साक्षिकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
