भिवंडी दि 30(आकाश गायकवाड )शहरातील अनेक तलावाच्या जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याने किमान चार तलाव नामशेष झाले असताना शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या वऱ्हाळ तलावाची पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे दुर्दशा झाली असून या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला असून दुर्गंधी पसरली असून त्या विरोधात नागरीक संतप्त असून तलावांचे संवर्धन पालिका करू शकत नसल्यास तो कामतघर गावाच्या स्वाधीन करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी केल्याने खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आयुक्त सुधीर देशमुख यांनी संपूर्ण तलाव परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे .भिवंडी पालिका क्षेत्रातील कागदावर 65 एकर परंतु प्रत्यक्षात 60 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला वऱ्हाळ तलाव भिवंडी शहरातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून या तलावातून शहरातील जुन्या परिसराला दोन एल टी पाणी पुरवठा केला जात असून ही या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण व तलावांचे सुशोभीकरण या कडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कामतघर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी शहरातील तलाव नामशेष होत असताना एकमात्र वैभव असलेल्या तलावाचा सांभाळ करण्यात पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याने तलाव मूळ कामतघर ग्रामस्थांच्या हाती सोपवावा अशी मागणी केली आहे, शहराचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ तलावांचे जातं करणे ही सर्वांची जबाबदारी असून या तलावातून भविष्यात 5 एम एल टी पाणी वितरीत केले जाणार आहे .परंतु तलावात तीन ठिकाणी नजीकच्या नागरी वस्तीतील मैल युक्त सांडपाणी तलावात झिरपत असल्याने तलावात दुर्गंधी व हिरवा तवंग पसरला असून त्यावर पालिका प्रशासन तात्काळ शुद्धीकरण व सुशोभीकरण या साठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
Similar Posts
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईडोबिंवलीत भव्य प्रदर्शन विक्री सोहळा यशानंतर दुसरे भव्य प्रदर्शन मुलुंड येथे 23 आणि 24 एप्रिलला
दिनांक ९ आणि १० एप्रिल रोजी पहिल्यांदाच ‘आम्ही गिरगांवकर’ आणि ‘हायफाय क्रीएशन्स’ यांच्या सयुंक्त विद्यमाने ब्राह्मण सभा, डोंबिवली पूर्व येथे भव्य प्रदर्शन विक्री सोहळा यशस्वी आयोजन करण्यात आला .ह्या सोहळ्याs विविध नामवंतानी हजेरी लावली . अनेक मराठी उद्योजक घडविलेत ते ‘आम्ही गिरगांवकर’ या समूहाने. ‘एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!’ या ओळींचा अवलंब करत ‘आम्ही…
सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका फेटाळल्या
दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली जो नोटबंदीचा निर्णय घेतला होता तो योग्यच होता असे सांगून नोटबंदीच्या विरोधातील ५८ याचिका सर्वोचं न्यायालयाने फेटाळल्या आहेत यात महाराष्ट्रातील एका याचिका कर्त्याचा समावेश आहे नोटबंदी चुकीची असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय दिला आहे. 201६ ची नोटबंदी वैध असून सर्वच्या सर्व 58 याचिका घटनापीठानं ४-१…
बजाज फायनान्सच्या पठाणी वसुली मुळे लोकांवर आत्महत्येची पाळी-बाबूभाई भवानजी .
मुंबई/ गरीब मध्यम वर्गीय माणसाची आर्थिक स्थिती बेताची असते त्यामुळे हा नोकरदार माणूस स्थिती चांगली नसल्याने आपला संसार गाडा चालवण्यासाठी अधून मधून कर्ज काढीत असतो . काही लोक छोटा मोठा धंदा सुरू करण्यासाठी कधी खाजगी सावकारांकडून तर कधी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढतात.मात्र त्यांच्या याच मजबुरीचा फायदा घेत बजाज सारख्या फायनान्स कंपन्या कर्ज देताना अव्वाच्या सव्वा…
शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
पुणे: अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन करत ,कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा…
इतिहास भारतातील करोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर्स सन्मानित जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु करोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांसह सर्व आरोग्य सेवक करोना योद्ध्यांच्या केलेल्या अद्भुत कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे करोना काळात…
खान बहादुर भाभा कुर्ला रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी -छोट्या संस्थांच्या पोटावर पाय देऊन बड्याना कंत्राटे
मुंबई/ पालिकेतील टेंडर घोटाळे काही नावे नाहीत पण एखाद्या कामाचे तोंडी टेंडर काढून ते मंजूर करण्याचा भयंकर प्रकार पालिकेच्या भाभा कुर्ला रुग्णालयात सुरू आहे.आणि आता त्याविरुद्ध छोट्या कंत्राटदार सेवा संस्थांनी आवाज उठवून पालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार केली आहे . दिनांक ८ जून 2022 बहुउद्देशिय 33 कामगार पुरविण्याच्या कामाच्या कंत्राट बाबत असाच झोल झालेला आहे ….
