मुंबई -मुंबई विमंतळवर दोन दिवसांपूर्वी 25 कोटींचे हेरोईन सापडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी एका आफ्रिकन महिलेकडून 18 कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले .चिलूफिया सेकेटी असे या महिलेचे नाव असून ती जंबिया येथून आली होती . तिच्या बॅगेत अत्यंत गुप्तपणे शिवलेल्या कप्प्यात तब्बल साडे तीन किलो अमली पदार्थ सापडले .ज्याची आंन्तराष्ट्रीय बाजारपेठेत 18 कोटी इतकी किमत आहे .आता हे अमली पदार्थ तिने कोणासाठी आणि कुठून आणले आहेत . याचा नारकोटिक्सचे अधिकारी तपास करीत आहेत .मात्र लागोपाठ सापडलेल्या या अमली पदार्थांमुळे आता या डीआरजी रॅकेटचा लवकरच पर्दाफाश केला जाईल असा विश्वास तपास यंत्रनेने व्यक्त केला आहे .
Similar Posts
त्रिपुरा दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात
त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद दोन दिवसांपासून उमटत आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई- त्रिपुरतील वादग्रस्त घटनेचे महाराष्ट्रात जे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामागे माजी खासदार वसीम रिझवी यांचा हात आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. वसीम रिझवी हे वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष असून २०१७ मध्ये त्यांच्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनी बाबत गंभीर आरोप झाले…
वापी आणि मुंबईत आयकर विभागाची छापेमारी
मुंबई – शहा पेपर्स कंपनी ३५० कोटींचा कर बुडवल्याप्रकरणी आयकर विभागाच्या रडारवर आहे. आज आयकर विभागाने या कंपनीच्या मुंबई आणि वापीतील १८ ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात २ कोटींची रोकड आणि २ कोटींचे दागिने सापडल्याचे समजते.आज सकाळीच आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळेस शाह पेपर्स कंपनीच्या मुंबई आई वापीतील कार्यालयांवर तसेच कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे…
आठवड्यातील दुसरी घटना पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकांचा बलात्कार
पुणे/ वानवडी भागात एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकासह सह जननी बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक तशीच घटना घडलेली आहे रस्त्याच्या कडेला आई सोबत झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे त्यामुळे महाराष्ट्राची ही सांस्कृतिक राजधानी आता वासनांध नराधमाची राजधानी बनली की काय अशी भीती वाटू…
भिवंडीत नात्याला काळिमा; १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार करणारा नराधम काका गजाआड ..
ठाणे : काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर ४८ वर्षीय काकाने बलात्कार केल्याची घटना भिवडी तालुक्यातील एका गावात घडली आहे. धक्कदायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अपंग आहेअसून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली . भिवंडी तालुक्यातील एका गावात पीडित अपंग अल्पवीयन मुलगी कुटुंबासह राहते. तर त्याच गावात नराधम काका ही राहतो. काही दिवसापूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र या घटनेमुळे अपंग असलेली पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली होती. त्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे रविवारी चौकशी केली असता, अत्याचाराची घटना समोर आली. त्यांनतर पीडितेच्या कुटूंबाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेला प्रसंग सांगताच, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात येऊन नराधम काकावर बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर करणार .. दाखल गुन्ह्यावरून आरोपी काकाचा ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी शोध सुरू केला असता, त्याला भिवंडी तालुक्यातील नाईकपाडा येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यानी दिली आहे. ज्याची अधिक चौकशी पोलीस करीत असून आज आरोपीला न्यायालयात हजर कऱण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
वाहतूक पोलिसाला तृतीय पंथाची मारहाण
मुंबई/ तृतीय पंथाची मुजोरी केवळ लोकल ट्रेन मधेच चालते असे नाही तर ते कुठेही लोकांना त्रास देतात काही दिवसांपूर्वी टोल नाक्यावर तृतीय पांथिनी एकाला मारल्याची घटना ताजी असताना गोरेगावच्या बांगुर नगर येथे एका तृतीय पांथियाने चक्क वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी तृतीय पंथाच्या तिघांना अटक करण्यात आलीय .एक तृतीय पंथी…
आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण
भाईंदर :-सत्ताधारी आघाडीतील आमदारांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संजय बांगर, अब्दुल सत्तर यांच्या पाठोपाठ आता महिला आमदारही मागे राहिलेल्या नाहीत मंगळवारी भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली . या घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केलं आहेआमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली…
