मुंबई – मुंबई महानगर पालिकेतील घोटाळेबाजणा पालिका प्रशासन कशा प्रकारे पाठीशी घालते याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर पालिकेने केलेली थातुर मातुर करवाई ! वास्तविक कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटे लोटे असताना निविदा प्रक्रीये पासून प्रत्यक्ष कामा पर्यन्त कंत्राटदार पालिका अधिकार्यांचे खिसे गरम करीत असतात .आणि हे तोडबाजीचे व्यवहार लाखोंच्या पटीत असतात त्यामुळे घोटाळा उघडकीस आल्यावर शिक्षाही तेवढीच कठोर व्हायला हवी परंतु पालिकेत चोर चोर मौसेरे भाई असा प्रकार असल्याने स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत दोषी आढळलेल्या कर्मचार्यांवर बाळा पुन्हा असे करू नको असे म्हणत एक नाजुक चपटी मारली आणि त्यांना सोडून दिले .अत्यंत नगणी अशी दंडात्मक कारवाई झाल्याने हे भ्र्ष्टाचार सही सलामत सुटले असे म्हणाला हरकत नाही . या घोटल्याची चौकशी करण्यासाठी पालिकेने उपायुक्त स्तरावरील त्रिदलीय समिति नेमली होती .दोन वर्षांनंतर या समितीचा अहवाल स्थायी समितीत मांडण्यात आला एकूण 83 जणांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये 69 दोषी आढळले . 50 अभियंता कर्मचार्यांवर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे . उर्वरित 13 पैकी एकाचा मृत्यू झाला उर्वरित 12 जणांवर कारवाई काय तर कोणाचे एका महिन्यासाठी तर कोणाचे कायमस्वरूपी 1500 ते 3 हजार रुपये वेतनातून कापून घेतले जाणार .म्हणजे सेवाकालीन त्यांनी कंत्र दाराकडून लाखोंच्या पटीत पैसे कमावले .आणि त्यांची चोरी पकडल्यावर पालिका त्यांच्या वेतनातून कापणार किती तर 1500 ते तीन चार हजार याला कारवाई म्हणायची की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन म्हणायचे तेच काळात नाही .घोटाळेबाजांवर जर अशा थातुर मातुर कारवाया व्हायला लागल्या तर पालिकेत आणखी लुटारू तयार होतील आणि मुंबईकरांच्या पैशाची लूटमार करतील अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .
Similar Posts
शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत – पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपाची लढाई
मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर…
महापालिका निवडणुकीवर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे विचारमंथन
मुंबई -देशातील सर्वात महत्त्वाची असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदारांना आज बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. विधानसभा, विधानपरिषद आमदार आणि लोकसभा व राज्यसभा…
रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉ. दुग्गल याचा परवाना रद्द करून त्याला अटक करा
मुंबई/ कधी काळी वैद्यकीय व्यवसाय म्हणजे ईश्वरी सेवा समजले जायचे पण आता मात्र हा व्यवसाय म्हणजे स्मागलिंगच्या व्यवसाया पेक्षाही खतरनाक झालाय कोरॉना काळात खाजगी डॉक्टरांनी खोऱ्यानी पैसा ओढून २० वर्षात जेवढे कमावले नाहीत तेवढे एका वर्षात कमावलं यात काही पथोलोजिकल लॅब वल्यांचाही समावेश आहे.कोरो ना रुग्ण वाढल्यावर काही डॉक्टरांनी धंदा नजरेसमोर ठेऊन खर्या्या्या्य्या्या्या््या्या्या्य्या्या्या खर्चाचे खोटे…
Covhidshild लशीच्या दोन डोस मधील अंतर वाढविण्याचा सल्ला
नवी दिल्ली :कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतराबाबत महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला असून, कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिला असून, आता कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.सध्याच्या घडीला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते…
पर्यायी व्यवस्थेशिवाय सी सी रोड साठीच्या खोदकामास परवानगी नाही
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून सिमेंट कॉंक्रिट (सी सी) रोडच्या कामासाठी निविदा प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. मुंबईत खड्डेमुक्तीसाठी सीसी रोडचा पॅटर्न महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून सी सी रोडसाठी खोदकामाच्या परवानगीबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. अतिशय अपरिहार्य कारण असल्यावरच ही परवानगी देण्यात येईल असेही परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. सीसी रोडच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेच्या…
काळया यादीतील कंत्राटदारांचे पालिकेतील आश्रयदाते कोण?
मुंबई/ महापालिकेत अधिकारी कंत्राटदार आणि सत्ताधारी यांचे एक सिंडिकेट असून रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणारे कंत्राटदार असोत की नाले सफाई करणारे कंत्राटदार असोत या कंत्राटदारांनी पालिकेला किती जरी चुना लावला तरी त्यांची पगडी सलामत राहते आणि काळया यादीत नाव येवून सुधा पुन्हा त्याच कंत्राटदारांना काम मिळते हे सर्व रॅकेट कशा प्रकारे पालिकेत काम करते याची…
