भिवंडी दि 16 (आकाश गायकवाड ) सदैव वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकां साठी मुमबी नाशिक महामार्गा वरील भिवंडी ठाणे बायपास रस्ता हा मृत्यूचा सापळा बनून राहिला आहे .गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास या रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी वरील मायलेकराचा अपघाती मृत्यू झाला आहे .बेबीबाई बाळाराम काकडे वय 48 व नितीन बाळाराम काकडे वय 26 रा आमणे पाडा ता.भिवंडी अशी मयतांची नावे आहेत.
आमणे पाडा येथील हे दोघे आई व मुलगा दुचाकी वरून पुर्णा येथील आपल्या मुली कडे दुचाकी वरून गणपती दर्शना करीता गेले होते तेथे जेवण उरकून दुपारी 4 वाजताच्या सुमारास ते आपल्या घरी माघारी नाशिक वहिनी वरून जात असताना मानकोली गावाच्या हद्दीतील अरुणकुमार क्वारी समोरील रस्त्यावर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली असता ते दुचाकी वरून तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला .या घटनेने आमणे पाडा येथे शोककळा पसरली असून स्थानिक नारपोली पोलिसांनी अज्ञात वाहना विरोधात अपघातास जबाबदार धरून त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
