मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला. अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की, राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत, याचे जरा नियोजन करा . साकी नाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.
Similar Posts
धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा…
महाविकास आघाडीच्या सभेत पुन्हा-उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल
नागपूर – महाविकास आघाडीच्या आजच्या व्जर्मूथ सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज्यातलं शिंदे भाजप सरकारवर जोरदार हल्ला बोल केला तसेच मोदींवरही कठोर शब्दात टीका केलीमहाविकास आघाडीची आजची दुसरी सभा आहे, त्यानंतर आज महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये होत आहे. मला जुने दिवस आठवले. तेव्हा एकत्र नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. आम्ही त्यावेळी कर्जमुक्त करुन…
सर्व्हेची दिशा सत्ताधाऱ्यांना सोयीची नाही – शरद पवार
मुंबई/ सी व्होटर चां सर्व्हेवर आपला पूर्ण विश्वास नाही मात्र सर्चेची दिशा सत्ताधारी पक्षासाठी सोयीची नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे .सिव्होटरणे काही दिवसापूर्वी केलेल्या सर्व्हेत आता जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर महविकास आघाडीला 34 जागा मिळतील असे भाकीत केले होते त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील मिशन 45 ला धक्का बसला आहे यावर प्रतिक्रिया…
ज्यांनी देशाचा गौरव वाढवला त्या पहिलवानांवर जिंकलेली पदके गंगार्पण करण्याची पाळी आलीय
हरिद्वार : देशातील दिग्गज कुस्तीपटूंचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. पण सरकारकडून खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे हे खेळाडू आज चांगलेच आक्रमक झाले. सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी हे कुस्तीपटू थेट हरिद्वारला गंगा तिरावर दाखल झाले. त्यांनी आपली…
ठाकरेंच्या १६ आमदारांना अपात्र करण्याच्या मागणीवरीलयाचिकेचा निर्णय १४ जुलैला
नवी दिल्ली – शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १४ जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. दोन महिने झाले तरी अध्यक्षांकडून निर्णयाबाबत हालचाल होत नसल्याचा दावा करत ठाकरे गटाच्या…
पुणे येथील हौसिंग प्रश्नासंदर्भात अधिवेशनात सरकार सोबत बैठक घेणार-
*आ. प्रविण दरेकरांचे संयुक्त मेळाव्यात आश्वासन पुणे- पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने वकील, सोसायटी/अपार्टमेंटचे चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी आणि सभासदांचा संयुक्त मेळावा नुकताच केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृह येथे पार पडला. या मेळाव्यात संबोधित करताना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी पुण्यातील हौसिंग प्रश्नासंदर्भात येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसोबत बैठक…
