मुंबई/ एन सी बी ने अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केल्यानंतर आता ड्रग मफियानी चक्क औषधांमध्ये अमली पदार्थांची भेसळ करून ते विकायला सुरुवात केली असून शिवाजी नगर पोलिसांनी या नव्या ड्रग विक्रीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे
शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.निरीक्षक किशोर गायके यांना माहिती मिळाली होती की सिरप मधून अमलिपदर्थाची विक्री केली जात आहे सादर माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून पूर्व द्रुतगती मार्ग सायन येथील हंस ट्रॅव्हल कंपनी या कार्यालयात छापा टाकून तिथल्या कुरियारची तपासणी करून शिरप मध्ये मिक्स केलेला कोडियान या अमली पदार्थाच्या१५५६ बाटल्या जप्त केल्या ज्याची अंदाजे किंमत ६,१४००० इतकी आहे या प्रकरणी कुरिअर स्वीकारणाऱ्या मोहित मोहिन खान आणि ड्रग तस्कर करीम रहीम शेख ऊर्फ कुबड्या याला अटक केली .या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
