महालक्ष्मी – हाजीअली येथील हिरापंन्ना शॉपिंग सेंटर मध्ये गुन्हे नियंत्रण कक्षाने छापा घालून तब्बल सोळा लाखाची बनावट घड्याळे हस्तगत केली . या प्रकरणात दुकान क्रमांक 54, 68, 74 ,97 या ठिकाणी चा माल ताब्यात घेतला .
राडो, ओमेगा, हबलॉट यासारख्या प्रसिद्ध महागडी घड्याळ वापरण्याची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे या कंपनीचे घड्याळ स्वस्तात देण्याच्या बहाण्याने बनावट घडयाळे विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांना गुन्हे नियंत्रण कक्षाच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्ग दर्शना खाली कारवाई करण्यात आली .
Similar Posts
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
शुल्लक कारणावरून मुलीने जन्मदात्याला ठार मारले
इचलकरंजी . घरातील शुल्लक वादामुळे वडील मुलीवर रागावले त्याचा मुलीला इतका राग आला कि तिने जन्मदात्याची हत्या केली . या घटनेमुळे संपूर्ण इचलकरंजी शहरात खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे.इचलकरंजी मधील बर्वेमळा भागात शांतीनाथ केत्काले हे पत्नी आणि तीन मुलींसह राहतात. मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून घरात वाद झाला होता. त्यातून झालेले भांडण…
भिवंडीत नात्याला काळिमा; १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार करणारा नराधम काका गजाआड ..
ठाणे : काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर ४८ वर्षीय काकाने बलात्कार केल्याची घटना भिवडी तालुक्यातील एका गावात घडली आहे. धक्कदायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अपंग आहेअसून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली . भिवंडी तालुक्यातील एका गावात पीडित अपंग अल्पवीयन मुलगी कुटुंबासह राहते. तर त्याच गावात नराधम काका ही राहतो. काही दिवसापूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र या घटनेमुळे अपंग असलेली पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली होती. त्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे रविवारी चौकशी केली असता, अत्याचाराची घटना समोर आली. त्यांनतर पीडितेच्या कुटूंबाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेला प्रसंग सांगताच, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात येऊन नराधम काकावर बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर करणार .. दाखल गुन्ह्यावरून आरोपी काकाचा ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी शोध सुरू केला असता, त्याला भिवंडी तालुक्यातील नाईकपाडा येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यानी दिली आहे. ज्याची अधिक चौकशी पोलीस करीत असून आज आरोपीला न्यायालयात हजर कऱण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
रायगड मधून आठ महिन्यात 250 महिला , मुली बेपत्ता – धक्कादायक-मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता
रायगड जिल्ह्यात गत काही महिन्यापासून 18 वर्षाखालील मुलीं बरोबर विवाहित बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे . जिल्ह्यात आठ महिन्यात 250 जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे त्यामध्ये 156 महिलांचा समावेश आहे . मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे .वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळविण्यात…
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील ७४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य पदक देऊन गौरव
नवी दिल्ली / महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असून तिला शिवछत्रपतींच्या शौर्य शाली इतिहासाचा वारसा आहे आणि लष्कर असो की पोलीसदल आजही या दोन्ही ठिकाणी हा वारसा जपला जातोय.आणि महाराष्ट्रातील अनेक शूरवीर लष्कर आणि पोलीस दलात शौर्य गाजवत आहेत .पोलीस दलातील अशाच ७४ शुर विराना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले यात ४पोलीस अधिकाऱ्यांना…
भिवंडीत बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत उभारणाऱ्या बाप-लेकाला बेड्या; तर मुख्य आरोपी फरार..
भिवंडी दि 3 (आकाश गायकवाड ) भिवंडी महानगरपालिकेची बनावट बांधकाम परवानगीसह असेसमेंट नोटीस आणि मूळ जमीन मालक यांचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून इमारतीमधील २४ दुकाने आणि ३४ सदनिकांची मूळ मालकांना अंधार ठेवून ५ कोटी रूपयांत विक्री करणाऱ्या बाप – लेकाच्या जोडीला शांतीनगर पोलिसांनी दीड वर्षानंतर अटक केली आहे. किशोर रतिलाल सूचक , कुणाल सूचक अशी…
