नवी दिल्ली/रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अखेर आज सायंकाळी नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आलिंगन देऊन जोरदार स्वागत केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्र यांच्या जाचक टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभूमीवर दोन मोठ्या राष्ट्रांच्या सर्वाच्च नेत्यांची बैठक होत असल्याने जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. या दोन्ही देशात आता कोणते करार होतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पुतिन २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारतात आले आहेत. व्लादिमीर पुतिन ३० तास भारतात रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशात विविध करार होणार आहेत.रशियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. त्यातच भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केलेला असून त्यात रशियाशी तेल खरेदी केल्यानेही अमेरिकेने अधिकचा टॅरिफ लावलेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात काय करार होणार याकडे लक्ष लागले आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन भारतात दाखल झाले असते. नवी दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमध्ये स्वार होत पीएम यांचे निवासस्थान गाठले आहेत. पुतिन यांच्या स्वागतासाठी पीएम मोदी यांनी आज रात्री प्रायव्हेट डीनरचे आयोजन केले आहे.

