नाशिक – नवत्रोत्सवात दांडिया नृत्याची मोठी धूम असते . मात्र नाशिक येथील आडगाव परिसरात दांडिया दरम्यान एका डीजे ऑपरेटरला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने येथील नवरात्रोत्सवाला गालबोट लागले असून लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.
कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील जय जनार्दन फौंडेशन या मंडळाच्या वतीने दांडियाची आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी डीजे लावण्यात आला होता. मागील ७ दिवसांपासून या ठिकाणी दांडिया नृत्याची धूम सुरु होती.पण मंगळवारी रात्री त्याला गालबोट लागले. डीजेच्या तालावरील दांडिया नृत्य एन रंगात आलेले असतानाच डीजे ऑपरेटर पप्पू बेंडकुले याला विजेचा शॉक लागला . त्यामुळे पप्पूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तर आता पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.
