[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा पराभव – एनडीएचे सी पी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती


नवी दिल्ली/ उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होऊन विरोधकांची २३ ते २७ मते फुटली. आणि भाजप प्रणित एन डी ए आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी १५२ मतांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी.सुदर्शन रेडी यांचा पराभव केला.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी उप राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर, उपराष्ट्रपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विजयासाठी ३९१ मतांची आवश्यकता होती. भाजपा प्रणित एन डी ए आघाडी कडून महाराष्ट्राचे तात्कालीन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी करून रेडी यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली त्यात ७८८ पैकी ७६८ उमेदवारांनी मतदान केले. विविध पक्षाच्या १३ खासदारांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. दरम्यान मतदानानंतर निकाल जाहीर करण्यात आला. आणि एनडीएचे राधाकृष्णन यांना ४५२ तर इंडिया आघाडीचे रेड्डी यांना ३०० मते मिळाली आणि १५२ मताने राधाकृष्ण विजयी झाले. राधाकृष्णन यांचा विजय हा विरोधी पक्षांना मोठा धक्का म्हणता येणार नाही. कारण लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी त्यांचे संख्याबळ कमी होते. दोन्ही ठिकाणी एनडीएचे संख्याबळ ४३७ होते तर इंडिया आघाडीचे ३१८ होते. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास नक्की होता. पण या विजयाला विरोधी पक्षातल्या काही लोकांनी क्रॉस वोटिंग करून हातभार लावला.

error: Content is protected !!