मुंबई/ येत्या मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीसाठी अधिक कठीण बनली आहे.मात्र महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आता आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे.मात्र राज्य सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे दोन मिळून १७ प्रभाग राखीव होणार असून त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या दोन्ही ग्रान बसणार आहे.
मुंबई महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत – नियम २०२५ या नावाने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार यंदाच्या निवडणूकीसाठी चक्रानुक्रमे पद्धतीकरीता प्रथम निवडणूक ग्राह्य धरण्यात आली आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ज्या प्रभागात आहे ते प्रभाग आरक्षित होणार आहेत.मुंबई महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत – नियम २०२५ या नावाने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. नियमानुसार मुंबईतील कोणते प्रभाग आरक्षित होतील ते आता स्पष्ट झाले आहे. मुंबईत अनुसूचित जातींसाठी १५ तर अनुसूचित जमातींसाठी २ जागा राखीव असतील. या १७ जागांपैकी पंधरा जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे माजी नगरसेवक आहेत तर केवळ दोन जागा अशा आहेत जिथे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आठ, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पाच काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांपैकी गंगा माने यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.यापूर्वी मुंबईत चक्रानुक्रमे आरक्षण निघत होते. त्यामुळे २००७, २०१२, २०१७ मध्ये उतरत्या क्रमानुसार आरक्षण देण्यात आले होते. म्हणजे २००७ मध्ये जे प्रभाग आरक्षित होते ते वगळून पुढच्या प्रभागांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. परंतु, यावेळी नव्याने आरक्षण निघण्याची शक्यता भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केली होती. राज्य सरकारच्या अधिसूचनेमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.त्यामुळे ठाकरे गटाच्या रोहिणी कांबळे,विठ्ठल लोकरे,श्रीकांत शेट्ये,वसंत नकाशे,हर्षला मोरे,किशोरी पेडणेकर,अरुंधती दुधवडकर,रेखा रामवंशी,तसेच शिंदे गटाच्या उपेंद्र सावंत,परमेश्वर कदम, समृद्धीकाते,अंजली नाईक,गंगा माने,प्रतिमा खोपडे,काँग्रेसच्या नादिया शेख,भाजपचे राजेश फुलवारी,आशा मराठे या माजी नगरसेवकांना फटका बसणार आहे.

