[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

एसटी कामगारांची दिवाळी गोड६ हजार रुपये बोनस मिळणार

।मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एन दिवाळीच्या तोंडावर आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उचलण्याचे जाहीर करताच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून पगारवाढीबाबत आणि आर्थिक अडचणींबाबत आंदोलन केलं जात होतं. अखेर दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ६००० रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाला दर महिन्याला ६५ कोटी रुपये देणार आहे. हे पैसे सलग चार वर्षे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी हात खुला करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ४८ हफ्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ६५ कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटी कर्मचारी संघटनांसोबत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्ताने ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यसोबतच १२ हजार ५०० रुपयांच्या उचलसंदर्भात देखील घोषणा करण्यात आली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत प्रति महिना सरासर ७५००रुपये वेतनवाढ फरक हप्ता देण्याचं मान्य झालं. त्याचबरोबर ६००० रुपये दिवाळी भेट रक्क देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं. दरम्यान, “एसटी कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्या प्रलंबित आहे. तरीही सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे सुद्धा शक्य नव्हते ते देण्यात आले आहे. यासाठी सरकार महिन्याला 65 कोटी रुपये देणार आहे. आंदोलन स्थगित करायचे की चालू ठेवायचे याचा निर्णय अजून झालेला नाही. पण बऱ्यापैकी चांगला निर्णय झाला आहे”, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलकांनी दिली आहे.दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडून वारंवार आपल्या विविध मागण्यांसाठी याआधीदेखील आंदोलन करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी मोठं कामबंद आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळे ग्रामीण भागात गावांचा थेट तालुक्यांशी संपर्क तुटला होता. आता देखील तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारकडून पूरेपूर काळजी घेतली जाते.सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महायुती सरकारने प्रथमच एसटी कामगारांसाठी आर्थिक मदतीचे मोठे निर्णयवघेतळेवाहे पुढील ४ महिन्यात एसटी कामगारांना सरकारकडून भरघोस मदत मिळणार आहे.

error: Content is protected !!