[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठा आंदोलकांना मुंबईत नो एन्ट्री! न्यायालयाचा निर्णय


मुंबई /ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा बालहट्ट धरणाऱ्या, आणि त्यासाठी एन गणेशोत्सवाच्या काळात हजारो मराठा बांधवांना मुंबईत आणून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या, मनोज जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे.सरकारने त्यांना मुंबई बाहेर आंदोलन करण्यास सांगावे असे न्यायालयाने म्हटले आहे.त्यामुळे मनोज जरांगे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही ते मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम राहिल्याने, त्यांच्यावर कारवाईसाठी सरकारवर दबाव वाढला आहे.दरम्यान आज झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत शिंदे समितीला मुदतवाद देण्याची जरांगेंची मागणी मान्य करण्यात आली आहे.
मराठा आंदोलकांनी मुंबईच्या आझाद मैदानात २९ ऑगस्टला आंदोलन करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सुनावणी होऊन मुंबईत आणि मुंबईतील आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही, असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक मोर्चा घेऊन येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या इराद्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना डिवचले आहे. मनोज जरांगे यांना आता डंके की मीचोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री असेल. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाने जरांगींची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तसेच मोर्चाचा मार्ग बदलण्याची विनंती केली परंतु जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यामुळे संघर्ष अटळ आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गणेशोत्सव काळात हे आंदोलन करण्यात येणार असल्याने या विरोधात जनहित याचिका करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकेत जरांगे यांना प्रतिवादी करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना केली. तसेच, जरांगे यांच्या मोर्चाबाबत याचिकाकर्ते आणि सरकारची बाजू थोडक्यात ऐकल्यानंतर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.
गणेशोत्सवात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, त्यात मराठा आंदोलकांचीही मोठी गर्दी होईल आणि मुंबईकरांची गैयसोय होईल. शिवाय, गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर या आंदोलनामुळे अधिक ताण येईल, असेही न्यायालयाने आंदोलनासाठी पर्यायी जागेची सूचना करताना स्पष्ट केले
जरांगे यांनी आंदोलनासाठी परवानगी घेतलेली नाही, असे सांगण्यात आल्यावर त्यांना परवानगी घेण्याची मुभा राहील. जरांगे यांनी संबंधित यंत्रणेकडे आंदोलनासाठी परवानगी मागावी. ती दिली गेल्यास शांततेत आंदोलन करावे. किंबहुना, जरांगे यांच्या आंदोलनास परवानगी दिल्यास गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांना मुंबईऐवजी खारघर येथे पर्यायी जागा उपलब्ध करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने जरांगे यांना नोटीस बजावताना प्रकरण दोन आठवड्यांनी ठेवले.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या जरांगेना, गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी नाकारल्यानंतर, ते अधिकच आक्रमक झाले आहेत. मात्र मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या ओबीसी समाजानेही आता आक्रमक भूमिका घेत, ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी, जरांगेंच्या विरोधात संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

error: Content is protected !!