रस्त्यावरच्या खड्ड्यातूनच बाप्पांचे आगमन
आज गणेश चतुर्थी! विघ्नहर्त्या गणरायाचे धूमधडाक्यात स्वागत केले जात आहे.रस्त्यावरचे खड्डे चुकवीत येताना भक्तांच्या बरोबर बापाला सुधा धाप लागली आहे.पण आता ही नेहमीचेच असल्याने त्याच्याशी लोकांनी जुळवून घेतले आहे.आजपासून संपूर्ण देशभर गणेशोत्सवाची धूम आहे.महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत या गणेशोत्सवाचे एक वेगळेच महत्व असते. अगदी विदेशातील पर्यटकही मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात .२२ ते २४ फुटांच्या उंच मूर्ती, आणि वेगवेगळ्या विषयावरचे देखावे, तसेच डोळ्याची पारणे फेडणारी सजावट आणि रोषणाई हे सर्व पुढील ८ दिवसव पहायला मिळणार आहे.पुढील ११दिवस आनंदी आनंद असणार आहे.गणेश भक्तांच्या समोर शेकडो विघ्न आहेत. पण त्याचा बाप्पाच्या भक्तीवर जराही परिणाम होत नाही . किती जरी विघ्न आली तरी शेवटी विघ्नहर्ता आपल्या घरी येतोय ,तोच ती विघ्न दूर करील ही श्रध्दा मनात असल्याने, उत्सवात कधीही खंड पडला नाही. अगदी कोरोना सारख्या महामारीत सुधा गणेशोत्सव साजरा झाला .यावरून गणेश भक्ताची आपल्या बाप्पावर किती श्रध्दा आहे हेच दिसून येते.गणेशोत्सव हा जरी हिंदूंचा सण असला तरी इतर धार्मिय सुधा तितक्याच भक्तिभावाने या सणात भाग घेतात.मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळात मुस्लिम कार्यकर्ते आहेत. आणि उत्सवाच्या सुरुवातीपासून ते विसर्जनापर्यंत हे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवात सहभागी झालेले असतात .गणेश उत्सवला उद्या सुरुवात होते आहे. गणेशोत्सवाची खरी धूम कोकणात असते .त्यामुळे कोकणी गणेशभक्त गेल्या काही दिवसांपासूनच आपल्या कोकणातल्या गावाकडे जात आहेत.त्याच्यासाठी कोकण रेल्वेने खास जादा गाड्या सोडल्या आहेत.पण रस्ते मार्गे जाणाऱ्या गणेश भक्तांची हालत खराब आहे.कारण मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे.२००८ पासून हा महामार्ग बनतोय आतापर्यंत १७ हजार कोटी खर्च झाले पण अजून हा महामार्ग तयार झालेला नाही त्यामुळे या महामार्गावर जो १७ हजार कोटींचा खर्च दाखवण्यात आला तो पैसा कोणाच्या घशात गेला हे बाप्पा आता तूच शोधून काढ आणि त्यांना शिक्षा कर असे गणेश भक्त गणरायाला सांगत आहेत.जी अवस्था मुंबई गोवा महामार्गाची आहे तिचं अवस्था मुंबईतील रस्त्यांची आहे.मुंबई महापालिकेने दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले पण खड्डे काही bujle नाहीत त्यामुळे या वर्षीही बाप्पांचा प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे. मुंबईत सर्वाधिक चर्चा होते ती लालबागचा राजा गणेशाची. या वर्षी राजाच्या उत्सवाचं ९२ वं वर्ष आहे. राजाचा दरबार ५० फूट उंच करण्यात आला आहे. तसंच विशेष बाब म्हणजे लखनऊहून आलेल्या मुस्लिम कारागीरांनी गणपतीच्या मंडपासमोरचा मखमली पडदा शिवला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटी येत असतात. लालबागचा राजाचे मुख-दर्शन आणि नवसाची रांगही चर्चेचा विषय असतो.
