[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जरागे विरुद्ध भाजप नेते आक्रमक – आंदोलकांच्या शुक्रवारच्या मोर्चामुळे मुंबईत तणाव


मुंबई /मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ तारीखला मुंबईत धडकणाऱ्या जरांगेंच्या मराठी आंदोलकांविरुध आता भाजपा नेतेही आक्रमक झाले आहेत.फडणवीसांच्या आई बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या जरांगेना जीभ हासडून हातात देण्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.तर जरांगेना नक्षलवादी घोषित करा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे.दुसरीकडे सदावर्ते यांनी जरागे विरुद्ध पोलिस महासंचालकांकडे तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही आरक्षण दिले नाही तर सरकार उलथून टाकू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे .त्यामुळे महाराष्ट्रातले वातावरण चांगलेच तापलं आहे.
राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा.. व्यवसाय बंद ठेवा.. नोकरदार यांनी काम बंद करा… मुंबईकडे निघा…. जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. संपूर्ण महाराष्ट्र २७ ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील समर्थकांसह जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. २९ ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण दिले नाही तर सरकार उलथून टाकू असा इशारा देत जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे निघणार आहेत.
दरम्यान मनोज जरांगे यांना मुंबईत २९ तारखेला आंदोलन करू देण्यात येऊ नये, कारण सदर आंदोलन ही मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकारण आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. त्यामुळे त्वरित त्यांना थांबवा. गुन्हा दाखल करा. अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
राज्यासह मुंबईत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवामध्ये मोठा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्ती करत आहेत आणि मुंबईमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा लोंढा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. असेही गुणरत्न सदावर्ते आपल्या तक्रारीत म्हणाले आहे. मुंबईच्या जीडीपीलेवर देखील मोठा परिणाम होणार आहे. तेव्हा ही बाब परवडणारी नाही. या विरुद्ध डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस अधीक्षक जालना यांना तक्रारी दाखल केली आहेत. लवकरचआझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.दरम्यान
बीडच्या गेवराईत मोठा राडा झाला. गेवराईत एका बॅनरवरुन हा राडा झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एकमेकांकडे चप्पल भिरकवण्यात आली. विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाच्या समर्थनार्थ बॅनर लावला होता. त्यावर लक्ष्मण हाके यांनी आक्षेप घेत टीका केली होती. यावरुन वाद तापलेला असताना लक्ष्मण हाके आज गेवराईत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि मोठा राडा झाला.

error: Content is protected !!