राज्यात 20 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई/ राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे. जाणून घेऊयात कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी कुठे झाली बदली.
एम एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस: २०१० ) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांची वसई-विरार महानगरपालिका वसई येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपा मुधोळ-मुंडे (आयएएस:आरआर: २०११) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड पुणे यांची पुण्यात समाज कल्याण आयुक्त म्हणून नीलेश गटणे (आयएएस:एससीएस: 2012) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. श्री ज्ञानेश्वर खिलारी (आयएएस:एससीएस:2013) संचालक, ओबीसी, बहुजन कल्याण, पुणे यांची अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री अनिलकुमार पवार ( आय इ एस एस डी एस: २०१४) महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, वसई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, एम एम आर एस आर ठाणे इथं नियुक्त करण्यात आली आहे.
श्री सतीशकुमार खडके (आय इ एस एस सी एस २०१४ ) संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय मुंबई यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे इथं नियुक्त करण्यात आले आहे.नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर भालचंद्र चव्हाण,सिद्धार्थ शुक्ला, विजयसिंग देशमुख,त्रिगुण कुलकर्णी,विजय भाकरे,महेश पाटील,गजानन पाटील, महेश देवरे,श्रीमती मंजिरी मनोलकर ,आशा पठाण यांचीही बदली करण्यात आली आहे
