वसई/ वसई विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचनालय अर्थात इंडिने टाकलेल्या धाडीमुळे पालिकेची मोठी बदनामी झाली याच कारणास्तव पालिकेने त्यांना निलंबित केले आहे.
वाय एस रेड्डी यांचा पालिकेतील कार्यकाल अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे .त्यांना २५लाखाची लाच घेतल्या प्रकरणी१८ एप्रिल २०१६ रोजी लाचलुचपत विभागाने अटक केली होती . त्यावेळी कायद्यानुसार ते ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यामुळे त्यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान या निलंबनाच्या आदेशाला त्यांनी २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते तिथे सुनावणी होऊन २०१९ मध्ये त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. आणि त्यांना पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात घेण्याचे न्यायालयाने आदेश दिले. त्यानुसार ते पुन्हा पालिका सेवेत रुजू झाले. परंतु जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असे म्हणतात. त्याप्रमाणे रेडी यांनी पुन्हा आपल्या सेवाकाळात काही नियमबाह्य कामे करायला सुरुवात केली होती. त्यातून त्यांनी बरीच माया गोळा केली. मात्र याबाबतच्या काही तक्रारी ईडीकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या तक्रारींची गंभीर दखल घेऊन इंडिने १४ मे २०२५ आणि १५ मे २०२५ या दोन दिवशी पी एम एल ए ऍक्ट २००२ अन्वये वाय एस रेडी यांच्या हैदराबाद मधील वेगवेगळ्या ठिकाणावर धाडी टाकल्या असता या धाडीत ८.६ कोटी रुपये रोकड आणि २३.२५ कोटींचे मौल्यवान दागिने सापडले. या संपूर्ण कारवाईची माहिती प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे वसई विरार महापालिकेची मोठी बदनामी झाली. याच बदनामीचे कारण पुढे करून वाय एस रेडी यांना निलंबित करण्यात आले आहे.

