जम्मू काश्मीर मधून विशेष विमानाने आलेल्या प्रवाशांचे विमानतळ स्वागत!
मुंबई, दि. 25 जम्मू काश्मीरवरून राज्य शासनाने केलेल्या सुविधेतून विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्वागत केले
संध्याकाळी 6 वाजता विशेष विमान मुंबईत दाखल झाले
अकोला, जळगाव, धुळे येथील हे प्रवासी होते. आज त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे विशेष आभार मानले. भारत माता की जय.. अशा घोषणा देऊन प्रवाशांनीच विमानतळ परिसर दुमदुमून टाकला.विमानतळ झालेल्या स्वागतासाठी मंत्री आशिष शेलार यांच्यासह आमदार मुरजी पटेल आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
