ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भारतातील पाकिस्तान्यांची हकालपट्टी सुरू – ४८तासात देश सोडण्याचे आदेश


मुंबई/पहेलगाम मध्ये निरापुरात पर्यटकांवर गोळीबार करून २७ जणांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तान विरुद्ध भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत, भारतात आलेल्या पाकिस्तानी विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला .तसेच त्यांना ४८तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातूनही पाकिस्तानी नागरिकांची हकलपट्टी सुरू झाली आहे. त्यासाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे .दरम्यान पाकिस्तानी अभिनेते किंवा खेळाडू यांच्या बद्दल कुठलीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .
पहेलगाम हल्ल्यानंतर दिल्ली मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सी सी एस ची एक महत्वपूर्ण बैठक झाली होती. याच बैठकीत भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द करणे, सिंधू जलकरार रद्द करणे, अटारी बॉर्डर बंद करणे यासारखे महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते.त्यापैकी सध्या भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द करून त्यांना ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार पोलिसांकडून देशातील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या विजावर आले होते. त्यातील 11 पाकिस्तानी पुण्यात राहत होते तर इतर काही पाकिस्तानी मुंबई,ठाणे,नवी मुंबई आदी शहरांमध्ये होते. या सर्वांची ओळख पटवून विजा रद्द करून त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.काही पाकिस्तानी स्वतःहून भारतातून मायदेशी परतत आहेत. तर काही जण मुदत मागत आहेत. पण त्यांना कोणत्याही प्रकारची मुदत अथवा मदत दिली जाणार नाही. असे सरकारने स्पष्ट केले आहे.पाकिस्तानचे काही खेळाडू आणि अभिनेतेही मुंबई पुण्यात आले होते. त्यांच्या बाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. त्यांनाही इतर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रमाणे ४८ तासात बाहेर काढले जाईल. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले .दरम्यान पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या महाराष्ट्रातील ६ जणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.एकीकडे पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द करून त्यांना भारतातून बाहेर काढले जात असतानाच पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्धाची तयारी सुरू केली आहे. भारत पाक सीमेवर त्यांनी सैन्य उभे केले आहे .तर समुद्रमार्गे जास्त धोका वाटत असल्याने पाकिस्तानच्या नौसेनेने समुद्रात युद्ध अभ्यास सुरू केला आहे. भारतीय सैन्याकडूनही जोरदार तयारी सुरू आहे.
चौकट
२ दहशतवाद्यांची घर उडवली
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांची लष्कराने बॉम्बस्फोटाने घरे उडवली.त्यातील आदिल हा त्राल मध्ये रहायचा त्याचे घर उडवण्यात आले तर काश्मीर मधील आणखी एक दहशत वाड्याचे घर बॉम्ब स्फोटाने उडविण्यात आले.तर बंदीपुरा येथील चकमकीत एक दहशतवादी मारला गेला.

error: Content is protected !!