मुंबई/ सध्या शिवसेना आणि शिदें सेना यांच्यात जो संघर्ष सुरू झाला आहे त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत . आज शिवसेना कार्यकर्त्यानी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडले तर ठाण्यात शिंदे समर्थकांनी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन केले . त्यामुळे रस्त्यावरचा हा संघर्ष आणखी पेटणार असून बंडखोर आमदार 30 जून पर्यंत गोहती मध्येच थांबणार आहेत .दरम्यान एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेने आता चांगलीच कोंडी केली असून 17 बंडखोर आमदारांचे निलंबन अटळ असून त्यांच्यावर आता अपात्र्तेची टांगती तलवार लटकली आहे .
Similar Posts
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर -विरोधी पक्षाला संसदेत मोठा धक्का
नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया आघाडीसाठीआजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. हे विधेयक मंजूर झाल्याने आता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे…
बदलापूर का अडकतोय पुराच्या विळख्यात .
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात आठवड्याभरापूर्वी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून सावरत बदलापूर आता पूर्वपदावर आले आहे. मात्र पुरामुळे झालेल्या नुकसानीचा फटका सर्वसामान्य बदलापूरकरांना सहन करावा लागला आहे. नदी पात्राजवळच्या भागात, नाल्यांवर बांधकामे झाल्याने, नाले अरुंद झाल्यामुळे बदलापूरला पुराचा तडाखा बसत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे बदलापूरात नदीपात्राजवळच्या व शहरातील नाल्यांच्या जवळ झालेली बांधकामे नियमानुसार झाली…
तिसरे महायुद्ध अटळ
साम्राज्य विस्ताराच्या द्यासाने पछाडलेल्या महासत्ता जगाला शांततेने जगायला देणार नाहीत असे आता वाटायला लागले आहे कारण एकीकडे रशियाने युक्रेंशी युद्ध छेडले आहे तर दुसरीकडे चीन तैवांचा घास घ्यायला तापला आहे.अशा स्थितीत अमेरिका दोन्ही प्रकरणात छोट्या राष्ट्रांच्या बाजूने उभी आहे कदाचित त्यामुळेच चीन तैवान वर हल्ला करायला घाबरत आहे पण रशियाने मात्र जगाच्या विरोधाची पर्वा न…
तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल – अजित पवार गटाचा भाजपला इशारा
मुंबई : राज्यातील महायुतीत काहीही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित…
भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था ; गाव विकास संघर्ष समितीचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
भिवंडी दि 17 भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे ….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकच वादा, प्रकाशदादा” नारा घुमणार-आमदार प्रकाश सुर्वेंचे उद्या बुधवारी होणार जंगी स्वागत
मागठाण्याच्या वीराची ठाण्याच्या महावीराला साथ मुंबई- मागठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सुर्वेंच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता आमदार सुर्वेंच्या कर्मभूमीत त्यांचे उद्या बुधवारी सायंकाळी 5 वाजता जोरदार स्वागत होणार असून आतापर्यंतचे मोठे शक्तिप्रदर्शन मागठाण्यात होणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत…
