मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून गोविंदांच्या उत्सवावर टास्क फोर्सने फिरवले पाणी- दहीहंडी उत्सव रद्द
मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून दही हंडी उत्सव सुधा रद्द करायला लावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून भाजपा आणि मनसेने मात्र सरकारचा विरोध झुगारून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.काल मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी बाबत गोविंदा पथकांच्या समन्वय समितीची बैठक…
