: मुंबई – भाजपा नेते सध्या शिवसेनेच्या मागे हात धुवून लागले आहेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात इडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेले असतानाच .आता तिकीट यंत्र खरेदी प्रकरणात गुरुवारी लोकायुक्त त्यांची चौकशी करणार आहेत . भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी सदर प्रकरणी परब यांच्या विरोधात राज्यपाल कोशारी यांच्याकडे तक्रार केली होती .त्यात म्हटले होते की लॉकडाउन काळात आय टी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली होती . त्यामुळे इलेक्ट्रानिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील एनवेळी बदल करण्याचे आदेश परब यांनी दिले होते . त्यानुसार कंत्राटदारच्या वार्षिक उलाढालीची 150 .कोटी वरुण 100 कोटींवर आणण्यात आली . त्याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तीमध्ये आणखी काही बदल करण्यात आले निविदां मधील शर्ती मधील बदल मंजुरीसाठी संचालक मंडळपुढे ठेवावेत अशी सूचना महाव्यवस्थापकांनी केली पण परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अगोदर निविदा प्रप्र्सिद्ध करावी आणि नंतर तिला संचालक मंडळाची मंजूरी घ्यावी असे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले .मर्जीतील एका कंत्राटदारला काम देण्यात आले त्याचा परिवहन मंडळाला 250 कोटींचा भुर्दंड बसणार आहे . त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी कोटेचा यांची मागणी आहे .
Similar Posts
शेतकऱ्यांच्या ३५९ दिवसांच्या संघर्षांत समोर मोदी सरकार अखेर झुकले-मोदींचा माफीनामा-केंद्राची फजिती
दिल्ली/ सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ३५९ दिवसांपासून जे आंदोलन सुरू ठेवले होते त्यासमोर अखेर मोदी सरकार झुकले आणि काल सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेतले.शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आम्ही अपयशी ठरली त्यामुळे हे कायदे परत घेत आहोत आता आंदोलन शेतकऱ्यांनी आपापल्या आणि शेतात जावून काम करावे असे मोदींनी…
शनिवार निकालाचा दिवस! कर्नाटकात सत्तांतर अटळ
बंगळुरू/ शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटक विधासभेसाठी झालेल्या 224 जागांचा निकाल जाहीर होणार आहे एक्झिट पोल क्या सर्व नुसार कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक 120 ते 140 जागा मिळणार आहेत तर भाजपला 80 जागांवर समाधान मानावे लागेल त्यामुळे कर्नाटकातील भाजपची सत्ता जाणार असे एक्झिट पोल वरून दिसत आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झाले होते…
ओबीसी समाजासाठीही सरकारची उपसमिती स्थापन
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन मुंबई जाम करणाऱ्या मराठ्यांच्या ८ प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या.त्यामुळे ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.कारण ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत याबाबत सरकार २ महिन्यात निर्णय घेणार आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे जारी सरकार सांगत असले .तरी मराठा आणि कुणबी एकच आहेत असा निर्णय झाल्यास, ओबीसी…
पाकिस्तानच्या हल्ल्यांवर भारताचे प्रतिहल्ले सुरूच – सीमा वरती शहरांमध्ये ब्लॅकआऊट
४०० ड्रोन च्या साह्याने भारतावर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलानवी दिल्ली/ भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर ,गुरुवार पहाटे पासून पाकिस्तानने तुर्कीने दिलेल्या ४०० ड्रोन द्वारे भारतातील ३६ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले परतवून लावले. यात पाकिस्तानचे १०० हून अधिक ड्रॉन तसेच ३ लढाऊ विमाने नष्ट करण्यात आली. त्यामुळे आता पाकिस्तानने…
कमला मिलमधील बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई/ लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने आणि इथे झालेल्या बेकायदेशीर बांधकामाच्या तक्रारी येऊ लागल्याने अखेर पालिकेने इथल्या बेकायदेशीर बांधकामावर तोडक कारवाई केली. कमला मिल कंपाऊंड मधील थोयोब्रोमा रेस्टॉरंट,मॅकडोनाल्ड, शिवसागर हॉटेल, नॅनो कॅफे,स्टारबक्स, बिरा टेंपरूस आणि फूड बाय देविका यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताश्विनी जोशी, डीएमसी प्रशांत सपकाळे आणि वार्ड अधिकारी…
उद्धव ठाकरे कुटुंबासह मोदींना भेटून आले – शिक्षणमंत्री केसरकर यांचा खळबळजनक दावा
मुंबई: आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे. पण यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा…
