पाकिस्तानचा तिसऱ्यांदा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला – नकवीच्या हसते ट्रॉफी नाकारून पाकचे नाक कापले
दुबई/आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी आणि २चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह आशिया कप स्पर्धेवर नवव्यांदा नाव कोरलं. तसेच गतविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. भारताने या सामन्यात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. जिथे शक्य होईल तिथे नांगी ठेचली….
