अरेरे, छे छे…काय बोलू आता ? कसं समजावू ?
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग मध्यंतरी माझ्या जवळच्या एका वैद्यमित्राचा एन्जीयोग्राफी आणि लगेचच एन्जीयोप्लास्टी केल्याचा मेसेज एका कौटुंबिक गटात वाचला. आणि उत्स्फूर्तपणे ~तोंडातून,~ बोटातून टाईप झाले…“अरेरे, छे छे, काय बोलू आता, कसं समजावू ?” (हा हन्त हन्त…. स्टाईल) हे तर अगदी काॅमन झाले आहे.बाजारात जाऊन पिकलेला फणस फोडून गरे आणि आठळ्या त्याच्याकडूनच सुटी करून…
