गुणांपेक्षा माणूस मोठा आहे: शिक्षणातील स्पर्धा आणि मानसिक आरोग्य
आज शिक्षण हे ज्ञानाचे साधन कमी आणि स्पर्धेचे रणांगण अधिक बनले आहे. गुण आणि रँक यांनाच यशाचे अंतिम मोजमाप समजले जाऊ लागले आहे. नीट सारख्या परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी बसतात, पण जागा मर्यादित असतात. यामुळे लाखो विद्यार्थी “कमी बुद्धिमान” असे मानले जात नाहीत, पण निकालाच्या दिवशी समाज “हुशार” आणि “नालायक” अशी विभागणी करतो. ही विभागणी अन्यायकारक…
