मालवणीतील शाळेच्या खाजगीकरणाविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन
मुंबई/शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले.मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व…
