बीबीसीचा लघुपट व छाप्यांची संगती!
बीबीसी या इंग्लंडमधील वृत्तसंस्थेने “इंडिया -द मोदी क्वेश्चन” नावाचा लघुपट दोन भागात प्रदर्शित केला. गोधरा येथे झालेल्या दंगलीमध्ये नरेंद्र मोदी यांची सक्रिय भूमिका असल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे. या लघुपटावर भारतात बंदी घालण्यात आली. याच सप्ताहात प्राप्तिकर खात्याने बीबीसीच्या कार्यालयांवर छापे घातले. या घडामोडींचा हा मागोवा. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी ) या ब्रिटिश वृत्तसंस्थेच्या कार्यालयावर…
