महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली…
