गुन्हेगार राजकीय नेत्यांना सत्तेतून दूर करणारे विधेयक लोकसभेत सादर – गंभीर गुन्ह्यात ३० दिवस तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान पदासह मुख्यमंत्री,आणि मंत्रिपदही जाणार
नवी दिल्ली: लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंतप्रधान , मुख्यमंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील तीन विधेयकं मांडली. यावेळी विरोधकांनी मोठा गदारोळ केला. या सगळ्या गदारोळात शहांनी विधेयकं सदनासमोर मांडली. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री , राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मंत्री यांना गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारी आरोपाखाली ३० दिवसांपर्यंच अटक झाल्यास त्यांना पदावरुन दूर करण्याची तरतूद नव्या विधेयकात आहे. शहांनी मांडलेल्या…
