राज्यपालांच्या स्व-गणनेने राज्यातील जनगणनेचा आरंभ
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलेल्या स्व-गणेनेने देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा ‘जनगणना २०२७’चा महाराष्ट्रातील औपचारिक आरंभ आज लोकभवन मुंबई येथे करण्यात आला. महाराष्ट्र स्थापना दिनी जनगणना सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी राज्यातील जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ही स्व-गणना दिनांक १ ते १५ मे या कालावधीत होणार असून त्यानंतर जनगणना…
