ठाणे जिल्ह्यात ठाकरे सेनेला धक्का- माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंचा राजीनामा
नवी मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विशेषत: ठाणे, नवी मुंबईतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. विठ्ठल मोरे हे यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विठ्ठल मोरे हे नवी मुंबईत बेलापूर विधानसभेचे संपर्कप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख देखील झाले. नुकतेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रतिष्ठेचे…
