ठाकरेंच्या पक्षातून फुटून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार खासदारांवर! शिंदे सेनेच्या बैठकीत निर्णय
मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा करम्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणायची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर दिली आहे. जो विश्वास ठेवत नगरसेवकांनी शिंदेंची साथ धरली त्यांना जागा…
