भाजपला मुंबई अडाणीच्या घशात घालायची आहे/ उद्धव ठाकरे
मुंबई/आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत. इतकं पोटतिडकीने बोलल्यानंतर डोक्यात तिडीक गेली पाहीजे. ती जाणार नसेल तर जय भवानी, जय शिवाजी बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. पहिल्या सभेला मीदेखील होतो. आज आमच्या खांद्यावर धुरा आलीय. ठाकरे बंधु एकत्र का आले हे आज सर्वांना कळाले असेल. भावकी एकत्र आलेयत, आता गावकी एकत्र येतेय. अस्तित्वासाठी ठाकरे एकत्र आलेयत,…
