पत्रकार संघाचे लोणावळ्यातील विश्रामधाम-कौटुंबिक जिव्हाळा जपेल- रामशेठ ठाकूर
मुंबई- बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शब्दात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. २० लाख रुपयांची वैयक्क्तिक देणगीही त्यांनी या…
