मुंबई : दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी, मुंबादेवी 223 ब्लॉकचे अध्यक्ष कै. नितीन रामचंद्र रेडकर यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.
सार्वजनिक जीवनात जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे कै. रेडकर यांनी बी विभागातील समाज विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या कठीण प्रसंगी रेडकर परिवारास ईश्वर धैर्य व मानसिक बळ द्यो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. कै. रेडकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.
सा. मुंबई जनसत्ता या वृत्तपत्राचे ते हितचिंतक होते. बी प्रभागातील अडचणी प्रश्न सातत्याने मांडण्यासाठी ते मार्गदर्शन करत होते. निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे नगरसेवक निकम यांच्यासोबत सातत्याने सोबत उभे होते.

