सक्षम उमेदवारांना डावलण्याच्या हालचाली सुरू असल्याने मुंबई काँग्रेसमध्ये असंतोष ?
मुंबई/यंदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र अवस्था आणखीनच वाईट होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आल्याचे बोलले जात आहे. कारण पक्षासाठी दिवस रात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नको त्यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली…
