मुंबई उपनगर जिल्ह्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या आढाव्याची बैठक घेण्यात आली.
२०१६ च्या सर्वेक्षणात मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४,१९४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. ही जमीन राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका (BMC), म्हाडा व केंद्र सरकारच्या मालकीची आहे. या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ९२६ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यापैकी १६० प्रकल्प पूर्ण झाले असून, ३२२ प्रगतीपथावर आहेत. ११४ प्रकल्प विविध कारणांमुळे स्थगित आहेत. या प्रकल्पांतून १,७५,५११…
