मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाविरुद्ध गोदी कामगारांची इंदिरा गोदीत प्रचंड निदर्शने
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या पगारवाढसाठी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने द्विपक्षीय वेतन समितीची स्थापना केली आहे, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट आर्थिक संकटात असल्यामुळे, या समितीमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचा समावेश करू नये, असे पत्र मुंबई पोर्ट ट्रस्टने केंद्र सरकारला पाठविल्यामुळे गोदी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता, त्यामुळे मुंबई…
