शिक्षकदिनी मुस्लिम शिक्षकाचा सत्कार केल्याने वाद!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मानेगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आणि खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी मानेगाव येथील विठ्ठल मंदिरात विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला होता. गावातील शिक्षक शौकत बाशु शेख यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी “मुस्लीम आहेस, गोमांस खाणाऱ्याना मंदिरात…
