[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कांद्याचा वांदा लवकरच मिटणार


केंद्र सरकार २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणार
दिल्ली – निर्यात शुल्कातील ४० टक्के दरवाडीच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आता २४१० रुपये दराने २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांद्याचा वांदा लवकरः संपणार आहे.
कांद्याच्या प्रश्नावर एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धावत दिल्लीत आले. वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्याशी त्यांची भेटही झाली. पण ही भेट संपते न संपते तोच निर्णयाची माहिती आली ती मात्र थेट जपानमधून. 2 लाख टन कांदा केंद्र सरकार प्रति क्विंटल 2410 रुपये दरानं खरेदी करणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ट्वीटमधूनच केंद्रानं याबाबत घेतलेल्या उपायांची माहिती कळाली. जपान दौऱ्यावर असतानाच त्यांनी अमित शाह, पीयुष गोयल यांच्याशी फोनवरुन केलेल्या चर्चेचाही उल्लेख त्यात होता.
कांद्यावरच निर्यात शुल्क केंद्र सरकारनं तब्बल ४० टक्के इतकं लावलं आणि संपूर्ण कांदा पट्ट्यात त्याची प्रतिक्रिया उमटली. गेले दोन दिवस मार्केट बंद होतं, त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे तातडीनं वाणिज्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचले.तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन सुरु केले होते

error: Content is protected !!